बिबट्याने केली पाच बकऱ्याची शिकार…

जळगाव जामोद ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) पाणी व अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेताहेत.. अनुचित घटनाही घडताहेत. सध्या जळगाव जामोद परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरीकांची भांबेरी उडाली असून, काल मध्यरात्री बिबट्याने गोठ्यातील 5 बकऱ्यांच्या नरडीचा घोट घेतल्याचे समोर आल्याने लोक बिबट्याच्या दहशतीत दिसत आहेत.
या परिसरात बिबट्याने यापूर्वीही अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पडला आहे.26 मार्च रोजी रात्री दोन वाजता देखील बिबट्याने 5 बकऱ्यांची शिकार केली. शहरातील रशीद शेठ यांच्या प्लॉटमधील रहिवाशी आणि शहा अशीच शहा यांच्या मालकीच्या बकऱ्या घराजवळील गोठ्यामध्ये बांधल्या होत्या.बिबट्याने मात्र त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी वैद्यकीय अधिकारी परिहार यांनी जनावरांची ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केले.दरम्यान सूळपूर शिवारात बिबट्याचा वावर वाढलेला दिसतो. त्यामुळे शहर व परिसरात बिबट्या आला रे ss पळा.. पळा!’ असे चित्र आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज असताना, वनअधिकारी मात्र उपायोजना करण्यात कुचकामी ठरत असल्याचा आरोप होतोय.पत्रकार किंवा नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना फोन केला असता ते प्रतिसाद देत नसल्याचाही आरोप केला जात आहे.