Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
भंगारच्या दुकानाला लागली भीषण आग….

रायपूर ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) अगदी काही वेळेपूर्वी रायपूर येथील पेट्रोल पंपाच्या 50 फुट अंतरावरील एका भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
या भंगार दुकानाला कशामुळे आग लागली याचे सध्या कारण कळले नसून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल सुद्धा येथे पोहोचलेले नाही. भंगार दुकान पूर्णता आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. धुरांचे लोट आसमंत भेदत आहेत.सुदैवाने पेट्रोल पंपापर्यंत या आगीची धग पोहोचली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून, आग विझवण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत.