शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न…

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- आगामी काळातील सण उत्सव बंधुभावाने साजरे करा जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नका किंवा आलेली पोस्ट समोर फॉरवर्ड करू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले यावेळी माणसाकावर अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील नगरपालिका चे मुख्य अधिकारी गणेश पांडे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे उपस्थित होते
आगामी येणारे सण उत्सव म्हणजे गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी भीम जयंती हनुमान जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी मुलांना शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. सामाजिक स्वास्थ बिघडेल असे वक्तव्य कोणी करू नये अक्षय पारे पोस्ट व्हायरल करू नये जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपली आहे