लोनवडी येथे आर ओ प्लॅन काम बंद पडलेल्या ठिकाणी प्रहारने उभारली गुढी
मंजूर झालेली कामे ग्रामपंचायतीने मार्गी न लावल्यास कार्यालयास टाला ठोकू प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी काम करत असते त्यात रस्ते,पाणी व्यवस्था,स्वच्छता आणि शिक्षण, शासनाच्या विविध योजना यांसारख्या कामांवर लक्ष केंद्रित करते परंतु लोनवडी गावातील ग्रामपंचायत ही मंजूर झालेले कामे अर्धवट सोडून नंतर कासव गतीने पूर्ण करते त्यात कित्तेक महिने उलटून जातात तरी काम पूर्ण होत नाही अशातच पंधरा वित्त आयोगातील आर ओ प्लॅन काम ग्रामपंचायत ने मागील वर्षापासून हाती घेतले मेन रस्त्याच्या कडेला पाईप टाकून गावच्या मध्यभागी आर ओ प्लॅन बसविण्यासाठी ओटा तयार केला नंतर त्यांच्या मनमानी कारभाराणेच त्या जागेचा बदलाव करून आर ओ चे अर्धवट काम करून सोडून दीले काम कधी पूर्ण करणार या विषयाची माहिती प्रहार कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायत सचिव तसेच सरपंच यांना मागील महिन्यापूर्वी विचारले असता पंधरा,आठ,दोन दिवसातच काम पूर्ण होईल अश्या उडवा उडविचे उत्तर देत आतापर्यंत दिवस पुढे ढकलत आले यांच्या चुकीच्या वर्तणुकीला व भूलथापाला आढा घालण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता राहुल बावस्कार, अजाबराव वाघ यांच्या नेतृत्वात तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत आर ओ प्लॅन रखडलेल्या जागी गुढीपाडवा दिवशी ग्राम पंचायत भूलथापा देणाऱ्या संबंधितांच्या नावाने गुढी उभारून नागरिकांनी रोख व्यक्त केला.यावेळी प्रहारचे राहुल बावस्कार,अजाबराव वाघ,ग्रामपंचायत शिपाई अर्जुन बावस्कार,मेंबर कृष्णा बावस्कार,सारंग बावस्कार,मंगेश दोळे,राजेश बावस्कार,चंदू वाकोडे, भीमराव वाघ व कार्यकर्ते उपस्थित असून गावातील मंजूरात झालेले फिरती कचरा गाडी,रस्त्यांचे काम अद्यापही सुरू केले नसून याविषयाची गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली येत्या काही दिवसांत गावातील सर्व मंजूरात झालेली कामे लवकरात लवकर मार्गी लावा नाहीतर ग्रामपंचायतीला टाला ठोकण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष वतीने ग्रामपंचायत मधील संबंधितांना देण्यात आला.