Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

नायब तहसीलदार प्रांजल पवार यांच्या हस्ते सचिन खंडारे यांना सुधारक सन्मान पुरस्कार २०२४ – २०२५ प्रदान !

Spread the love

सिंदखेडराजा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे दि . रोजी २८ मार्च रोजी पलसिद्ध मठातील सभागृहामध्ये महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम ) बुलढाणा ‘ व लोकसंचालित साधन केंद्र साखरखेर्डा, नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत सुधारक सन्मान पुरस्कार २०२४ – २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.

 

यामध्ये पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार सचिन खंडारे यांना सुधारक सन्मान पुरस्कार 2024 – 25 प्रधान करण्यात आला ‘सुदर पुरस्कार जणूंना तांडा येथे गेल्या चार वर्षापासून रक्षाबंधनाच्या दिवशी ते महिलांना साड्याचे वाटप करत असतात ‘ दिवाळीला किराणा सामान कीट वाटप ‘ रक्तदान शिबिराचा आयोजन ‘आदी कार्य ते करत असतात .व याचीच दखल घेत त्यांना सुधारक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून सरला पुरुषोत्तम तांगडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून सिंदखेडराजा तहसीलच्या नायब तहसीलदार प्रांजल पवार ‘पोलीस पाटील वैशालीताई हाडे ‘ सरला पुरुषोत्तम तांगडे ‘वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परिहार ‘वैद्यकीय अधिकारी ठोसरे मॅडम ‘चिखली अर्बनचे व्यवस्थापक श्याम पानगोळे ,साखरखेर्डा गावच्या माजी सरपंच समनताई जगताप ,कृषी योद्धा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात पाटील ‘ विश्वनाथ गुंडप्पा ‘ माजी जि . प . उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ‘ माजी पंचायत समिती उपसभापती सुनील भाऊ जगताप , माजी सरपंच कमलाकर गवई ‘ साखरखेर्डा ग्राम सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल ‘ तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर ‘ ग्रामपंचायत सदस्य देवानंद खंडागळे ‘माजी सैनिक अर्जुन गवई ‘ ज्येष्ठ पत्रकार अशोक इंगळे ‘ डी . एन ‘ पंचाळ , वरुडी सरपंच सुधाकर गारोळे ‘ हे उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ‘तहसीलदार प्रांजल पवार इतर मान्यवरांचे हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार सचिन खंडारे यांना सुधारक पुरस्कार २०२४ – २५ देऊन सन्मानित करण्यात आले ‘ इतर जणांना सुद्धा पुरस्काराचे वितरित करण्यात आले यामध्ये ‘ सुमेध गवई , अशांत जाधव ‘ मदन सरकटे ‘संजय देशमुख ,दिगंबर सौभागे ‘राजेश भालेकर ‘ अंकुश काळे ‘ दत्तात्रय शिंदे ‘ विशाल पडघान ‘ विष्णू डवके ‘सुधाकर वानखेडे ‘ प्रशांत साळवे ‘ सुनील तांगडे ‘सुनील गवई ‘ सोहन गवई ‘ अनिल मोरे ‘ राहुल खिल्लारे ‘पत्रकार समाधान सरकटे यांना सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ‘सचिन खंडारे यांना सुधारक सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे ‘

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page