मलकापूर बस डेपोला मिळाल्या नवीन दहा बसचे विधिवत पूजन करून लोकार्पण सोहळा संपन्न
दीर्घ प्रतीक्षा नंतर मलकापूर बस डेपोला मिळाल्या नवीन दहा बस...

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- रविंद्र गव्हाळे :-महाराष्ट्र परिवहन मंडळाने नव्याने नवीन बस खरेदी करून प्रत्येक बस डेपोला त्या देण्यात आल्या होत्या परंतु मलकापूर बस डेपोला एकही बस न मिळाल्याने मलकापूर मधील प्रवासांमध्ये नाराजीचा सूर वाहू लागला होता अशा दीर्घकाळानंतर आज गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर मलकापूर बस डेपोला मिळालेल्या दहा नवीन बसेसचे विधिवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या नवीन बसेसच्या आगमनामुळे मलकापूर व त्याच्या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी सुरळीत आणि सुलभ सेवा मिळणार आहे. यामुळे नागरिकांची वाहतूक समस्या कमी होईल आणि त्यांना अधिक आरामदायक व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.
या उद्घाटन सोहळ्याला आमदार चैसुखक संचेती , मलकापूर बस डेपो चे आगर प्रमुख ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजयजी काजळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे, स्थानिक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले.