शेतकऱ्यांच्या जीवन मानात आमुलाग्र बदल आणण्यासाठी कृषी विभागाने डोळ्यात तेल घालून काम करावे -आमदार सिद्धार्थ खरात

मेहकर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दि २ शेतकरी आत्महत्या रोखून शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृषी विभागाने तत्पर राहून 24 तास डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे #मेहकर येथे कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले आहे. ते पुढे बोलले की मेहकर व लोणार तालुका मिळून मतदार संघ आहे. या मतदार संघात १३% शहरी नागरिकरण आहे व उर्वरित ८७ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यांचे जीवन कृषीशी संबंधित आहे आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात बदल करायचा आहे सर्व विभागाचा आत्मा कृषी विभाग आहे तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनी मेहकर व लोणार साठी स्वतंत्र रोड मॅप तयार करावा .क्रॉप पॅटर्नमध्ये बदल करता येईल का? याबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठ,विज्ञान केंद्र, बुलढाणा च्या तज्ञांसोबत बातचीत करून काही वैज्ञानिक बदल करता येतील का ते शोधावे .आता सर्वत्र सोयाबीनचा पेरा होतो त्याआधी कॉटनचा पेरा होत होता मात्र आता सोयाबीनच्या भावाची अवस्था सगळ्यांना माहित आहे त्यावर पर्याय म्हणून दुसरं कोणतं पीक घेता येईल काय याबाबतही अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून मार्गदर्शन करावे. आपला शेतकरी आत्महत्या करतो याचं मुख्य कारण शेती उत्पन्न आहे .नापिकीमुळे तो आत्महत्येचे पाऊल उचलतो ही शेतकऱ्याची अवस्था आपल्याला बदलायची आहे. त्याकरीता जे यशस्वी शेतकरी आहे त्यांचे अनुकरण करून त्यांना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन मेळावे आयोजित करा. मला मेहकर मतदार संघात तात्काळ 10 वेअर हाऊस पाहिजेत शासन याकरीता सबसिडी देते आपण शेतकऱ्यांना तयार करा मेहकर व लोणार तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी दहा पल्प युनिट तयार करा त्याकरिता सर्व प्रयत्न करा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून युनिट तयार करण्यासाठी सहकार्य करा. शेतकरी मेळावे वेळोवेळी घेत जा. मोबाईल ॲप्स तयार करा शेततळे ,सिंचनाच्या बाबतीत मार्गदर्शन करत राहा, कृषी विभागाशी संबंधित डेअरी विभाग, पशुसंवर्धन ,पणन विभाग हे विकसित कसे करता येईल याकरीता प्रयत्न करा .तुमचा कृषीचा अधिकारी नोडल एजन्सी म्हणून काम करणार असे ठरवा. तुम्ही सर्व कृषी विभागाचे कर्मचारी अधिकाधिक कार्य प्रवण व्हा शेतकऱ्यांना मदत करा शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे शेतकऱ्यांच्या संघटना तयार करून त्यांचा माल पुढे दुसरीकडे कोठे पाठवायचा याबाबत ठरवत जा नवीन विकसित झालेले ए.आय. तंत्रज्ञान माझ्या मेहकर मतदार संघात आणा व कन्सल्टन्सी नेमा त्याचाही भरपूर फायदा शेतकऱ्यांना होईल. एकंदरीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने आता अहोरात्र मेहनत घ्यायची आहे असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव,रा.काँ.तालुका अध्यक्ष दत्ता घनवट,उपतालुकाप्रमुख रमेश देशमुख, युवा सेनेचे आकाश घोडे, ऋषी जगताप, विभाग प्रमुख साहेबराव हिवाळे, संदीप गवई ,स्वप्नील हाडे, जीवन घायाळ, विजय लहाने,संतोष लोखंडे सह उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ,कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अमोल झापे,प्रवीण देशपांडे,तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, लोणारचे रवी शिदोरे, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते