नुकसानग्रस्त भागाला आर्थिक मदत करा युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर….

चिखली:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:– चिखली तालुक्यामध्ये 1 मार्च पासून भाग बदलून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडत आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे पिकाचे अतोनात नुकसान होत आहे त्या भागामध्ये ताबडतोब पंचनामे करून त्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी 03 मार्च 2025 रोजी चिखली तालुक्यातील मेरा खुर्द मेरा बु शे. आटोळ मंडळा मधील अनेक गावासह व तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळ वारे यासह पाऊस झाला काही ठिकाणी तुरळक गारपिट सुद्धा झाली सुसाट वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, मका या पिका सह फळबाग भाजीपाला पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अगोदरच शेती पिकांचे भाव हे प्रचंड पडलेले असताना भाजीपाला या पिकाला कुठेही कुठल्याही मार्केटमध्ये भाव नसताना अशात पुन्हा मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकटाने अचानक घाला घातला असल्यामुळे आपण वेळ न दवडता आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करून तात्काळ सदर शेती पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळेल असा अहवाल सादर करावा अशी विनंती युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी जिल्हाधिकारी महोदयांकडे एका मेलच्या माध्यमातून केली आहे