दारू पिऊन वाहनाची दुचाकीला धडक!

खामगाव:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आपलं शहरातील एसएसडीव्ही शाळेसमोर 3 एप्रिल रोजी एका दूचाकीला दारू पिऊन भरधाव वाहन चालकाने मागून धडक दिल्याने दोघे दूचाकीस्वार जखमी झाले आहेत.
अर्जुन पांडुरंग जुनघरे रा. समता कॉलनी खामगाव असे आरोपीचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी आकाश रवींद्र बादलकर (21) रा.चांदमारी फैल खामगाव हा मावसभाऊ ऋषभ गायकवाड यांच्यासोबत एमएच 28 जी 7 46 क्रमांकाच्या दुचाकीने शेगाव कडे जात असताना एसएसडीव्ही शाळेसमोरील रस्त्यावर आरोपीने दारू पिऊन त्याच्या ताब्यातील एमएच 28-व्हि 2472 क्रमांकाचे वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून मागून जोरदार धडक दिली.झालेल्या अपघातात फिर्यादी आकाश व वृषभ दोघे जखमी झाले आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.