मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये घेण्यात आला पदवी प्रदान समारंभ ..!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येक व्यक्ती दररोज काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वयातलं शिक्षण त्याच वयात घेतलं तर व्यक्ती यशस्वी ठरतो असे प्रतिपादन आदित्य अर्बन संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार सुरेश देवकर यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचालित बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे पदवीप्रधान कार्यक्रमाचे आयोजन आज 3 एप्रिल रोजी करण्यात आले होते त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा शहरातील विधीतज्ञ व्हि डी पाटील हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ अण्णासाहेब म्हळसणे हे होते यावेळी पुढे बोलताना सुरेश देवकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत शिक्षणाच कार्य पूर्ण केलं पाहिजे शिक्षण हे आयुष्यात कधीही वाया जात नाही शिक्षणाने ज्ञान मिळते त्या ज्ञानाचा फायदा प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये करता येत असतो त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकाने आत्मसात करून स्वतःचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हणाले तर बुलढाण्यातील विधी तज्ञ ॲड व्ही डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी जिद्द परिश्रम विज्ञानवादी दृष्टिकोन आणि परिश्रम मूल्य डोळ्यासमोर ठेवूनच विनोबा भावेंचा आदर्श आणि संत गाडगेबाबांचा विचार अंगीकृत करून चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न कराव अस आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले तर अध्यक्षीय भाषणामध्ये मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ अण्णासाहेब म्हळसणे म्हणाले की विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन केल्यास यश हमखास मिळते यशाचं गमक डोळ्यासमोर ठेवून मिळालेल्या पदवीचा उपयोग समाजमन घडविण्यासाठी करावा अस आवाहन त्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बलवान विणकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रा सागर ढोणे यांनी केलं या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी आणि पदवी घेतलेली विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते