ग्रामीण महाराष्ट्रातलं दुसरं विनामूल्य डायलिसीस सेंटर मेहकर होतंय सुरू ..!
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे करणार 6 एप्रिला उद्घाटन ...!! जिल्ह्यातील डायलिसीस रुग्णांना मिळणार विनामूल्य सेवा ...!!!

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) ग्रामीण महाराष्ट्रातील दुसरे विनामूल्य डायलेसीस सेंटर मेहकर येथे सुरू करण्यात येत आहे या सेंटरचं लोकार्पण 6 एप्रिल राम नवमीच्या पावन पर्वावर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील डायलेसिस रुग्णांना विनामूल्य सुविधा येथे उपलब्ध होणार आहे
बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर आणि लोणार तालुक्यातील किडनीग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी नव्यानेच डायलिसीस सेंटर सुरू करण्यात येत आहे . या डायलिसिस केंद्राचा उद्घाटन व लोकार्पण मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवरील राजश्री मेडिकल आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांच्या वैद्यकीय सहायता मदत कक्षेचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते 6 एप्रिलच्या राम नवमीच्या पावन पर्वावर सकाळी 11 वाजता होणार आहे या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय रायमुलकर युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते अपेक्स किडनी केअर सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश शिरोडकर जनरल मॅनेजर श्रीकांत खोत उपस्थित राहणार आहेत ग्रामीण महाराष्ट्रातील हे दुसरे कॅशलेस अर्थात विनामूल्य डायलेसीस सेंटर मेहकर येथे सुरू होत आहे या सेंटरमुळे जिल्हयातील किडनी रुग्णांना विनामूल्य डायलेसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे