विधी व अध्यापक महाविद्यालयात दिक्षांत समारंभ संपन्न

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- विदर्भ युवक विकास संस्थचे मुकुल वासनिक विधी महाविद्यालय बुलडाणा व महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यामाने बुलडाणा येथे दि.०५ एप्रिल, २०२५ रोजी पदवीदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, प्रा. डॉ. संतोष आंबेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. अंड दत्तात्रय चव्हाण यांची उपस्थिती लाभली. संस्थेच्या सचिव प्रा. सौ. मिनल अबिकर, संस्थेच्या संचालिका प्रा.सौ. नवनिता चव्हाण, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या, शिल्पा ठाकरे, प्रा. सुरेखा इंगळे, प्रा. संतोष चानखेडे, अॅड छाया बावणे, प्रा.प्रिया पाटील, प्रा. बाविसाने, प्रा.गणेश बोचरे, प्रा. वृषाली काकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सी. मिनल आंबेकर यांनी संस्थेच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संतोष आंबेकर यांनी विद्याच्यर्थ्यांना सद्याच्या शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला तर प्रमुख अतिथी मा. श्री. अॅड दत्तात्रय चव्हाण यांनी कायद्याच्या चौकटीत राहुन विद्यार्थ्यांनी कार्य करावे. तसेच संस्थेच्या संचालिका प्रा. सौ. नवनिता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, मुकुल वासनिक विधी महाविद्यालच्या दिक्षांत समारंभास महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक विनोद रिडे, व्दितीय क्रमांक प्रशांत माळी, तृतीय क्रमांक बाळासाहेब दराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालपातून प्रथम क्रमांक व अमरावती विद्यापीठातून १२ व्या मेरोट विद्याथीनी किरण ठाकुर, व्दितीय क्रमांक आशा शर्मा, तृतीय क्रमांक छाया वरठे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आना दिक्षांत समारंभाच्या वेळी अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी युवा शाहिर विक्रांतसिंग राजपुत व किरण ठाकुर तसेच विधी शाखेच्या विद्याथीनी इशिता डोंगरदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडूबा पैठणे व पुजा शिगणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अदिती काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रविण नवघरे, अमोल लहाने, विजयसिंग हाडे, संजीवनी हाडे, शैलेश खेडकर, शिवचरण टिकार, शरद बाहेकर तसेच शिक्षक, पालक व विद्याची मोठ्या संख्येने उपस्थित होते.