विनामूल्य डायलिसीस सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा..उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आवाहन …!
ग्रामीण महाराष्ट्रातील विनामूल्य डायलिसिस केअर सेंटर मेहकर येथे लोकार्पित...!!

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):- करमाळा नंतर ग्रामीण महाराष्ट्रातील दुसरे विनामूल्य डायलेसीस सेंटर मेहकर येथे सुरू करण्यात आल आहे या डायलिसिस सेंटरचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा अस आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले
बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर आणि लोणार तालुक्यातील किडनीग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी विनामूल्य डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे या डायलेसिस केंद्राचं लोकार्पण आज 6 एप्रिलला रामनवमीच्या पावन पर्वावर शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिदे यांच्या वैद्यकीय सहायता मदत कक्षेचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते झाले राजश्री मेडिकल आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चिवटे बोलत होते ते पुढे म्हणाले की राजकीय इच्छाशक्ती असेल तर आरोग्य सेवा ही लोकांपर्यंत पोहोचल्या जाते याचं मूर्तीवंत उदाहरण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांचाच वारसा पुढे नेण्याचं काम केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आहेत त्यांच्यासोबत विनामूल्य डायलिसिस सेंटर सुविधा आपण जनतेला उपलब्ध करून देऊ शकतो याविषयी चर्चा झाली त्यावेळी आपण हे सेंटर मेहकर मध्ये सुरू करूया असे त्यांनी सांगितलं आणि आज हे सेंटर लोकांसाठी विनामूल्यरित्या सेवेत लोकार्पित होत असल्याचे चिवटे यांनी सांगतले.
कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय रायमुलकर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माधवराव जाधव युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी अपेक्स किडनी केअर सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश शिरोडकर जनरल मॅनेजर श्रीकांत खोत उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की म्हणाले की जनतेची सेवा करणार आरोग्य खात आहे या विभागाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर सोपवली त्यामुळेच आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली केंद्र सरकारच्यावतीने 70 वर्षांपूर्ण झालेल्या वयोवृद्धना आयुष्यमान योजनेच्या व्यतिरिक्त प्रति वर्ष पाच लाख रुपये आरोग्य सेवेसाठी सरकार च्यावतीने मदत केल्या जात असल्याचे त्यांनी दिली आरोग्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या विविध योजना सध्या कार्यरत आहे परंतु त्या योजनेचा लाभ अनेक लोक घेत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली विशेषता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड असल्याचेही त्यांनी सांगितले आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड प्रत्येकांनी तयार करून घ्यावे नाहीतर ऐनवेळी सर्वजण धावपळ करतात आणि योजनेचा लाभ मिळत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे तेव्हा लोकांनी जागृत राहून प्रत्येकांनी आयुष्यमान भारत योजनेच कार्ड काढून घ्यावं अस आवाहन त्यांनी केले ..राजेश्री वैद्यकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात दहा आधुनिक तंत्रज्ञानाचे डायलिसिस युनिट सुरू करण्यात आले आहे दररोज 30 ते 35 ल किडणीग्रस्त रुग्णांचे डायलिसिस या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे गरजू रुग्णांनी विनामूल्य डायलेसीस सेवेचा लाभ घ्यावा अस आवाहन करण्यात आले.