बुलढाणा येथील मॉडेलच्या विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात आली होती औद्योगिक सहल .. .!
उद्योगधंद्यांची विद्यार्थ्यांना देण्यात आली शालेय दहशतच माहिती...!!

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-वाणिज्य शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेयदशेतच औद्योगिक क्षेत्रातील ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये वाणिज्य भाग 3 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची औद्योगिक सहलीचे आयोजन नुकतील आयोजीत करण्यात आली होती
बुलढाणा जिल्ह्याला लागूनच असलेल्या जळगाव येथील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुदेव प्लास्टो चटई उद्योग समूहाला बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये वाणिज्य भाग 3 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेट दिली विद्यार्थ्यांनी तेथील कामकाजाची पाहणी केली यावेळी उद्योजकांनी विद्यार्थ्यांना सुद्धा उद्योग समूहाबद्दल माहिती दिली उद्योग क्षेत्रामध्ये जिद्द चिकाटी आणि परिश्रम असल्यास उद्योग समूह भरभराटीला येतो असंच उद्योजकांनी या विद्यार्थ्यांच्या समोर कथन केला या सहलीच आयोजन बुलढाणा मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापिक समृद्धी गोडबोले वसुधा घुमरे दीपक ननयी अक्षय नरवाडे सुचिता माळोदे अर्चना गावंडे पाटील मनीषा राऊत यांनी केल होते विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राविषयी ज्ञान देण्याचं काम या सहलीच्या माध्यमातून केल्या गेले .या सहलीमध्ये मॉडेल डिग्री कॉलेज वाणिज्य भाग तीन मध्ये शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते