मानस फाउंडेशन तर्फे बुलढाण्यात होणार सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळावा….

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- समाजातील एक महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी पुनर्विवाहाची संकल्पना राबवली जात असून या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 12 एप्रिल रोजी सैनिकी मंगल कार्यालय येथे एकल महिला विधवा, घटस्फोटीत सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आतापर्यंत मानस फाउंडेशन यांच्यातर्फे 90 च्या वर पुनर्विवाह झाले आहे. या पुनर्विवाह सोहळ्यामध्ये जोडप्यांना हळद लावण्यात येणार व त्यांचे कन्यादान सुद्धा करण्यात येणार आहे. यामध्ये या नवदांपत्यांना 15000 ची भांडी व पाच लाखाचा विमा सुद्धा मिळणार आहे.
सदर विवाह सोहळ्यास शुभ आशीर्वाद देण्यास व समाजातील दानशूर व्यक्तींच्या हस्ते कन्यादान करण्यात येणार आहे. सदर सोहळा सत्यशोधक पद्धतीने होणार असून सर्व विधी विधवा घटस्फोटीत महिलांच्या हस्ते होणार आहेत तरी सर्व एकल महिला भगिनींनी या सामाजिक बदलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. या एकल महिला विधवा परितक्त्या घटस्फोटीत सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळाव्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आव्हान मानस फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डी एस लहाने यांनी केले आहे.