गांधीनगर येथे दोन दिवसीय होमिओपॅथिक अधिवेशनाचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले उद्घाटन ..!
गुणवत्तापूर्वक उपचार पद्धतीत होमिओपॅथीची भूमिका महत्त्वपूर्ण .....केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव..!!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )भारतीय आरोग्यसेवात गुणवत्तापूर्वक उपचार पद्धतीत होमिओपॅथीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त १० एप्रिलला गुजरात राज्यातील गांधीनगर येथे आयोजीत करण्यात आलेल्या होमिओपॅथी अधिवेशनाच उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की होमीओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून व्याधी दुरुस्त करण्याचं काम केल्या जात आहे ही उपचार पद्धती विश्वास पात्र ठरत असून कमी खर्चात लोकांना उपलब्ध होत असल्यामुळे लोकही कल ह्या उपचार पद्धतीकडे वाढला आहे आयुष विभागाअंतर्गत आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना करण्यात येत आहे त्याचा फायदा संपूर्ण देशातील लोकांना होणार असल्याचेही केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलं या उद्घाटन कार्यक्रमाला सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (सीसीआरएच) चे महासंचालक डॉ. सुभाष कौशिक ,राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे (एनसीएच) प्रभारी अध्यक्ष डॉ. पिनाकिन एन. त्रिवेदी राष्ट्रीय होमिओपॅथी संस्थेचे संचालक डॉ. प्रलय शर्मा उपस्थित होते
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित दोन दिवसांचे अधिवेशन केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH), राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग (NCH) आणि राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था (NIH) यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे होत आहे या वर्षी, अधिवेशनाची थीम ‘ अध्ययन , अध्ययन आणि अनुसंधान ‘ आहे , जी होमिओपॅथीच्या विकासासाठी तीन पायाभूत स्तंभांवर प्रकाश टाकणार आहे . या कार्यक्रमासाठी जगभरातून प्रतिनिधी सहभागी झाले आहेत होमिओपॅथीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मेळावा ठरला आहे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे भारतातील सर्वात मोठी “लाइव्ह मटेरिया मेडिका” स्पर्धा आणि तिन्ही सहयोगी संस्थांनी एकत्रितपणे व्यापक चर्चा करण्यासाठी स्वतंत्र, विचारप्रवर्तक सत्रे आयोजित केली आहेत. जामनगरमध्ये WHO चे पहिले जागतिक पारंपारिक औषध केंद्र असल्याने, हा मोठ्या प्रमाणात होणारा कार्यक्रम पारंपारिक आणि पूरक औषध प्रणालींना मान्यता देणारा ठरणार आहे