झोपेची डूलकी लागल्याने इरटिका कार व ट्रकचा भिषण अपघात!
अपघातात 2 ठार, तर 3 गंभीर 1 जखमी!

बुलढाणा, आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-समृद्धी महामार्गावरील चॅनल नं.260-600 नागपूर कॉरिडोरजवळ दि 11 एप्रिल च्या 3 वाजता ट्रक व इरटीका कार चा भीषण अपघात होऊन 2 जण ठार 2 जण गंभीर व 1 जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात झोपीची डूलकी लागल्याने घडून आला.रतन चंदनचिव (70), गोपाळ रतन चंदनचिव (32) दोन्ही रा. वाशिम यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.तर पूजा रतन चंदनचिव (29) राणी गोपाल चंदनचिव (31) गंभीर जखमी झाले असून अर्चना रतन चंदनचिव (68) ह्या जखमी झाल्या आहेत.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताची चांगलीच समृद्धी असून,येथील अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नाही. 11 एप्रिल रोजी एमएच 11 सी क्यू 8566 क्रमांकाची इरटीका कार चालक शिवाजी इडोळे 27 रा. वाशीम हा पुण्यावरून वाशिम ला जात असताना,नागपूर कॉरिडॉर चॅनल नं.286-600 जवळ ईरटीका कारने समोरून येत असणाऱ्या आर जे 29 जीबी 2820 क्रमांकाच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.कार चालकाला झोपेची डूलकी लागल्याने हा अपघात झाला.