Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिवादन

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शासकीय विश्रामगृह येथे आज साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजकल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे, विधी अधिकारी ॲड राहुल झाभरे, समाज कल्याण निरिक्षक प्रदीप जाधव, समाजिक कार्यकर्त भैयासाहेब पाटील आदींनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.