विवरा येथील शेतकऱ्यांचे रस्ते अडविल्याप्रकरणी साखळी उपोषणा मंडपास तहसिलदार राहुल तायडे यांची भेट
लिंबू शरबत देत उपोषण सोडविले; शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांची उपस्थिती

मलकापुर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – :रविंद्र गव्हाळे :- तालुक्यातील ग्राम विवरा येथील कल्पा पाॅवर कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या येण्यासाठी चे रस्ते अडवून त्यावर सोलर प्लॅन्ट उभारला आहे त्या कंपनीचे काम तात्काळ बंद करून रस्ते मोकळे करण्याच्या मागणीसाठी आज दि. 12 एप्रिल शनिवार पासून शिवसेना (उ.बा.ठा) विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत सह असंख्य शेतकऱ्यांनी ग्राम विवरा येथे साखळी उपोषणास सुरुवात केली होती.
दुपारी तीन वाजेदरम्यान स्थानिक विश्रामगृह येथे उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांचेशी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, शहरप्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना शहर प्रमुख हरीदास गणबास,किसान सेना शहरप्रमुख सै.वसिम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी सह आदि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून तहसिलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार उगले , एमआयडीसी पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांचेसह उपोषण मंडपास भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी व कल्पा पाॅवर कंपनीच्या कर्मचारी यांचेशी चर्चा करत तिन दिवस कंपनीचे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठीच्या रस्त्यावरील काम बंद ठेवून शेतकऱ्यांचे कंपनीने बंद केलेल्या रस्ते मोकळे करण्या संदर्भात दि.16 एप्रिल बुधवार रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या दालनात शेतकरी व कल्पा पाॅवर कंपनीच्या संचालकांची बैठक घेण्याचे लेखी पत्र तहसिलदार राहुल तायडे यांनी देत उपोषणार्थींना लिंबू शरबत उपोषणाची सांगता केली.आज या साखळी उपोषणास शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, प्रमोद पाटील, विनोद सरोदे, सुरेश चौधरी, भागवत संबारे, दिलीप कोल्हे, ज्ञानदेव कोल्हे, रामराव पाटील, नंदकिशोर चोपडे, रामकृष्ण पाटील, वासुदेव बोरले, धनराज पाटील, शिवाजी पाटील, रामराव बोदडे, हरिहरसिंग राजपूत, रामदास संबारे, रामचंद्र संबारे,पुंजाजी कडू, संदीपसिंग राजपूत, सिताराम ढोण,लिलाधर डहाके, ज्ञानेश्वर संबारे, प्रमोद उमाळे, पंडित सोनुने, वासुदेव सरोदे, सुधाकर फिरके, प्रमोद चोपडे, रामभाऊ सरोदे, दिलीप फिरके सह परीसरातील असंख्य शेतकऱ्यांनी उपोषण सुरुवात केली होती.