जागर स्त्री शक्तीचा गजर राष्ट्र भक्तीचा….
१०० टक्के आरक्षण आणि संरक्षण स्वामीनी दिले- श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे

श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे यांचे अमृतुल्य हितगुज मार्गदर्शन…तब्बल २१ देशात स्वामीचे कार्य पोहचले..
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेशर जि. नाशिक द्वारे बुलढाणा शहरात दि १४ एप्रिल रोजी धाड रोड वर असलेल्या बी के लॉन्स या ठिकाणी जागर स्त्री शक्तीचा गजर राष्ट्र भक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. २० मे २०२५ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी सिंदखेड राजा येथे परमपूज्य गुरुमाऊली च्या उपस्थितीत महा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळा निमित आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांचे अमृतुल्य हितगुज मार्गदर्शन मिळाले आहे. विविध विषायांवर त्यांनी आपले मत सेवेकऱ्यांन समोर मांडले आहे. आपल्या हातातून स्वामीची सेवा झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे.
परमपुज्य माउली यांच्या आशिवार्दातून स्वामीचे कार्य देशातून विदेशापर्यंत पोहचतांना ८ हजार केंद्र आणि १५ कोटी सेवेकरी या स्वामी महाराजांना जोडले गेले आहे. एक नव्हे तर तब्बल २१ देशामध्ये स्वामीचे कार्य जोडले गेले आहे. हे कार्य करतांना कुठल्याही प्रकारचा जात धर्म जातीवाद केला जात नाही. राज्य कर्त्यांनी ३३ वरून ५० टक्के आरक्षण आपल्याला दिले आहे मात्र स्वामी सर्मथ महाराजांनी १०० टक्के आरक्षण आणि संरक्षण आपल्याला दिले आहे. खऱ्या अर्थानी तुम्हाला स्वातंत्र्य या कार्यांनी बहाल केले आहे. असे चंदकांत दादासाहेब यांनी मार्गदर्शनांतून सांगितले आहे.२० मे २०२५ रोजी या शुभदिवशी राजमाता जिजाउ यांच्या जन्म भुमी सिंदखेडराजा या ठिकाणी महिलांचा भव्य दिव्य असा महिलांचा सत्संग सोहळा आयोजित केला आहे. पुरूष सेवेकरी तसेच महिला सेवेकरी यांनी मोठ्या संख्याने या ठिकणी उपस्थितीत राहावे असे आव्हान सुध्दा या वेळी करण्यात आले आहे. या ठिकाणी धर्मसंकृतीचे प्रदर्शन, दर्गा शपथपदीचे प्ररायण आहे, गुरुमाउलीचे योग्य मार्गदर्शन या ठिकाणी राहणार आहे. बुलढाणा शहरात ३ केंद्र अगोदरच सुरू होते आता चौथे केंद्र तानाजी नगर येथे सुरू झाले आहे. त्या केंद्राला सुध्दा चंद्रकांत दादासाहेब यांनी भेट दिली आहे. बुलढाणा शहरात राउतवाडी केंद्र, सरस्वती नगर केंद्र, रामनगर केंद्र असे तीन केंद्रावरून स्वामीचे कार्याचे काम केले जात आहे. या सिंदखेडराजा या ठिकाणी डॉक्टर उबरहांडे यांच्या टिमच्या वतीने ग्रामअभियान राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची प्रस्ताविका राउतवाडी केंद्राचे प्रमुख अंकेशदादा देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित आदणीय श्री चंद्रकांत दादासाहेब मोरे, चिखली येथील शंतनूदादा बोंद्रे, बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड, श्री स्वामी समर्थ क्लिनिकचे डॉ उबरहांडे सर तसे मोठ्या प्रमाणात पुरूष व महिला सेवेकरी उपस्थितीत होते. शुभ कार्याच्या कार्यक्रमाला राउतवाडी केंद्राचे सेवेकरी यांनी परिश्रम घेतले आहे. त्यांच्या या सेवेमुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रमाणात झाला आहे. २० मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी तसेच सेवेकरी यांनी उपस्थितीत राहावे असे आव्हान या वेळी करण्यात आले आहे.