केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी केली ग्रामदेवता जगदंबा मातेची आरती …

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):- बुलढाण्याची ग्रामदेवता असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी संयुक्तरित्या जगदंबा मातेची आरती केली
बुलढाणेकरांचे ग्राम दैवत असलेल्या जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव दरवर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमेनंतर चौथ्या दिवसी साजरा करण्याची प्रथा आहे त्यानिमित्य चिखली रोडवरील जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागेते ज्या भाविकांची इच्छा पूर्ण होते ते भावीक आपला नवस पूर्ण करतात त्यानिमित्य एकदम मातीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते जगदंबा जगदंबा मातेच्या यात्रा महोत्सवानिमित्त निघणाऱ्या वहनाचे पूजन व जगदंबा मातेची आरती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या समावेत करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील रामदास चौथनकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते