मच्छी ले-आउट येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मच्छी ले-आउट येथील प्रांगणात अल्पसंख्यांक शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
जयंती उत्सवाच्या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश राऊत तर प्रमुख पाहुणे अमोल वाठोरे हे होते तर मंचावर संस्थेचे अध्यक्ष दीपक मोरे, वाठोरे साहेब उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम अध्यक्ष निलेश राऊत यांच्या हस्ते धम्म ध्वजाचा ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर उपस्थित समाज बांधवांनि त्रिसरण पंचशील घेतले.
संस्थेचे अध्यक्ष दीपक मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मुलमंत्र दिला सोबतच लोकशाहीची मूल्य दिली समता,स्वातंत्रता,बंधुता व न्याय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हे हक्क अधिकार दिला हे अधिकार व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल असे दीपक मोरे यांनी सांगितले