होमिओ तज्ञांनी महामानवांसारखे ज्ञानोपासक व्हावे – डॉ. अमरसिंह गौतम
डॉ. हॅनिमन व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त माऊली हाॅस्पीटलतर्फे व्याख्यान

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ) : ज्ञानाची उपासना करुन डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांनी तमाम जनतेचे शरीर स्वास्थ सांभाळणारी होमिओपॅथी निर्माण केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक स्वास्थ्य सांभाळणारी राज्यघटना तयार केली. या दोन्ही महामानवांकडून ज्ञानोपासनेची प्रेरणा होमिओ तज्ञांनी घ्यावी, असे आवाहन मुंबई येथील प्रख्यात होमिओ तज्ञ तथा विचारवंत डॉ. अमरसिंह गौतम यांनी केले.
येथील श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलच्यावतीने जागतिक होमिओपॅथी दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ‘होमिओपॅथीतील व्यावहारीकता व सेवा’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. गौतम बोलत होते. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजित शिरसाट, निमा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन पडघान, निमा वुमन्स फोरम च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सौ. वैशाली पडघान, निमा संघटनेचे बुलडाणा अध्यक्ष डॉ. चंद्रकिरण पवार, निमा युनानी फोरम चे बुलडाणा अध्यक्ष डॉ. शफाअत रहीम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सॅम्युएल हॅनिमन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या प्रमुख भाषणात पुढे बोलताना डॉ. अमरसिंह गौतम यांनी सांगितले की, ज्ञान मिळविणे ही अखंड चालत राहणारी प्रक्रिया आहे. मात्र आळस , निद्रा आणि चुकीचे विचार ज्ञानार्जनातील प्रमुख अडथळे असतात. प्रत्येक रुग्णांकडूनही वैद्यकीय तज्ञाला शिकण्यासारखे खूप काही असते. यासाठी प्रत्येक होमिओ तज्ञांनी जागृकतेने व अभ्यासूवृत्तीने रुग्णांना सेवा प्रदान करावी, असे आवाहन डॉ. गौतम यांनी केले.
यावेळी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने डॉ. अजित शिरसाट, डॉ. गजानन पडघान, डॉ. सौ. वैशाली पडघान, डॉ. चंद्रकिरण पवार, डॉ. लता बाहेकर, पत्रकार राजेंद्र काळे, पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे, प्रा. गजेंद्रसिंह राजपूत, प्रा. शैलेश वारे, पवन सोनारे, ॲड. सतीशचंद्र रोठे, शशिकांत इंगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटलचे संचालक डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ सागर जोशी यांनी केले तर डॉ पवन बजाज यांनी आभार मानले.कार्यक्रमाला डॉ. सौ. निलिमा जाधव, डॉ. सागर जोशी, डॉ. सौ. दीपाली जोशी, डॉ.पवन बजाज , डॉ. दीपाली बारोटे, डॉ. रसिका वानखेडे, डॉ.दीपक बढे, डॉ.स्वाती मसने , डॉ. किरण भुसारी , डॉ.उमेश जाधव, डॉ.गजानन सुरडकर , डॉ.गणेश वसु , डॉ. ए.यु. शेख, , डॉ.अभिजीत पाटील, डॉ.प्रभाकर पडघान, डॉ. दिशा चोपडे, डॉ. दीपाली जयस्वाल यांच्यासह होमिओपॅथी, आयुर्वेद व युनानी, पॅथाॅलाॅजी क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश राऊत, ज्ञानेश्वर पवार, रामेश्वर सोळंकी, प्रेमसिंग मोरे यांनी परिश्रम घेतले.