मॉडेल डिग्री कॉलेजमधील दोन विद्यार्थिनींना मिळाली रोजगार मेळाव्यातुन नोकरीची संघी …

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-विद्यार्थीदशेत शालेय शिक्षण घेत असतानाच मॉडेल डिग्री कॉलेजमधील दोन विद्यार्थिनींना रोजगार मेळाव्यातून नोकरीची संधी मिळाली आहे या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित रोजगार मेळाव्यात जाण्या संदर्भात कॉलेजच्या प्राध्यपकांनी मार्गदर्शन केले होते या रोजगार मेळाव्यामध्ये वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या कु वैष्णवी पवार व प्रियंका वैष्णव या दोन विद्यार्थिनींना टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे या संदर्भातील नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे या दोन्ही विद्यार्थिनीचं मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांनी अभिनंदन केलं यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते