केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्देशित केलेले केंद्र आणि राज्य सरकारचे तज्ञ आज केस गळती व नख गळती गावात पोहचणार…

बुलडाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- केस गळती झालेल्या रुग्णाचे नख गळती होत असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टीकोणातून केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या 9 विभागाचे तज्ञ केस गळती आणि नख गळती व्यक्तींना आणि त्यांच्या भेट घेऊन तथ्य संकलन करणार आहे . दिल्लीची ही टीम आज जिल्ह्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे
बुलढाणा जिल्ह्यातील पहुरजिरा , कालवड ,कठोरा ,भोन गाव , बोंडगाव यांच्यासह शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील तेरा गावांमध्ये केस गळती चे प्रकार समोर आला होता त्यानंतर केस गळती झालेल्या रुग्णांचे नख गळतीही होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळशी जावून शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने केंद्र आणि राज्यसरकारच्यावतीने नऊ विभागांचे तज्ञ या गावात पाठवण्यात येणार आहे या तज्ञांची टीम आज जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पाणी गुणवत्ता विभाग जल जीवन मिशन , लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथील डरमेटोलॉजी विभागाचे वरिष्ठ अध्यापक तज्ञ ,अन्नसुरक्षा व मानद प्राधिकरण विभागाचे(fssai)संचालक , भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयचे तज्ञ बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत हे सर्व तज्ञ केस गळती व नख गळती कुटुंबीयांना व आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना प्रत्यक्षात भेटून तथ्य संकलन करणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य उपक्रम कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.