Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत दादा गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Spread the love

बुलढाणा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत दादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या अंतर्गत टर्फ क्रिकेट स्पर्धेची सुरुवात आज मलकापूर रोड येथील फ्री हीट टर्फ या ठिकाणी करण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व श्रीकांत दादांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.या क्रिकेट स्पर्धेत बुलढाणा, मलकापूर, अकोला व खामगाव येथील विविध संघांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनाचा सामना चॅम्पियन 11 व आयफास 11 या संघांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात खेळविण्यात आला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत दादा गायकवाड मित्र मंडळ राजु शेळके , सुमित ठाकरे ,अजय मुठे, अभिजित गुर्जर ,स्वप्निल राजपुत , नितिन पंजवानी ,गजानन साखरे, रितेश जयस्वाल ,स्वप्नील शिंदे , उत्कर्ष डाफने,विकास राजपूत ,मलय बोरकर ,रवी काळे, अक्षय बगाडे, तुषार काटेकर , विजय सुरडकर सुनील भाकरे , आकाश दुतोंडे ,प्रतीक इंगळे , सौरभ राठोड अक्षय कुलकर्णी , राहुल इंगळे ,गोपाल सोनुने ,तुषार लहाने प्रमोद मेढे, भुषण वानखेडे ,सचिन इंगळे सुजल देशमुख,यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

आगामी दिवसांत देखील विविध सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page