केंद्रसरकारच्या जातीनिहाय जनगणना करण्याच्या लोककल्याणकारी निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीने स्वागत!!!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-दि 2 मे 2025 रोजी भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक संगम चौक बुलढाणा याठिकाणी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणना करण्याच्या लोककल्याणकारी निर्णयाचे स्वागत करून मोदी सरकारला धन्यवाद देण्यात आले, आभार मानण्यात आले.
गेल्या अनेक काळापासून काँग्रेसप्रणित सरकारे देशात दीर्घकाळ सत्तेवर राहून सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्याचे याआधीच्या त्यांच्या कुठल्याच सरकारने धाडस दाखविले नाही परंतु आता तेच विरोधक फुकटचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतांना पाहून त्यांच्या केविलवाण्या धडपडीचा जाहीर निषेधही व्यक्त करण्यात आला.भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते स्व.पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी अंत्योदय कल्याणाचा नारा देऊन समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शेवटच्या सामान्य माणसापर्यंत विकासाची फळे कसे पोचतील यासाठी प्रयत्न करण्याचा एकात्ममानववादाचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता त्याप्रमाणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून अंत्योदय उद्धाराचा पाया रचला आहे.
देशहितासाठी सर्वोच्च असलेले अनेक ऐतिहासिक निर्णय घेणारे मोदी सरकार आज पुन्हा एकदा आपल्या जातीनिहाय जनगणनेच्या लोककल्याणकारी निर्णयाने देशवासीयांच्या कौतुकास पात्र ठरले असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मोदी सरकार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, धन्यवाद मोदीजी, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यामध्ये ॲड.मोहन पवार, डॉ. राजेश्वर उबरहंडे, भगवान एकडे, स्मिताताई चेकटकर, सिंधुताई खेडेकर, उषाताई पवार, विनायक भाग्यवंत, योगेश राजपूत, सतिश भाकरे पाटील, मंदार बाहेकर, अरविंद होंडे, सतिश देहाडराय, विश्राम पवार, चंद्रकांत बर्दे, प्रदीप बेगाणी, कुलदीप पवार, शरद एकडे, राजेश पाठक, प्रवीण गाडेकर, प्रतीक गायकवाड, अभिषेक वायकोस, किसनराव खेडेकर, किशोर लांडगे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.