Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

श्री पुंडलीक महाराज महाविद्यालयात  ‘बिझीनेस कम्युनिकेशन स्कील्स’ या विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न…

Spread the love

नांदुरा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-स्थानिक श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे जि. बुलढाणा येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॅा अलका मानकर व विभाग प्रमुख प्रा राहुल माहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बिझीनेस कम्युनिकेशन स्कील्स’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दादाराव गायकवाड होते. तर प्रमुख वक्ते म्हणून स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगांव जि बुलढाणा चे आय क्यु ए सी समन्वयक सहयोगी प्राध्यापक डॅा मनोहर वासनिक होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परियच प्रा राहुल माहुरे यांनी करुन दिला.प्रमुख वक्ते म्हणुन बोलतांना डॅा मनोहर वासनिक यांनी सांगीतले की, व्यवसाय संवादातील कौशल्ये म्हणजे व्यवसायात प्रभावीपणे संवाद साधण्याची आणि माहिती देण्याची क्षमता विकसित करणे होय. या कौशल्यांमध्ये बोलणे, ऐकणे, लेखन आणि इतर प्रकारच्या संवादाचा समावेश होतो. ही कौशल्ये व्यवसाय संबंध सुधारण्यासाठी, टीमवर्कसाठी, आणि चांगल्या निर्णयासाठी आवश्यक आहेत.

 

आजच्या स्पर्धेच्या युगात विविध आव्हाने, बदल आणि सतत जोखमींचा सामना करणाऱ्या व्यवस्थापकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक सक्षम नेतृत्व होण्यासाठी तुम्हाला अधिक ऐकणे आणि अधिक प्रभावीपणे संवाद साधणे आवश्यक आहे. जेणेकरुन जीवनात यशस्वी व्हाल म्हणूनचं संवाद कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रफुल्ल खंडारे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा राम ढोरे यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page