Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजचा स्टेट बोर्ड इ.12 वी मध्ये 100 % यश

Spread the love

बुलढाणा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-स्थानिक सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज या स्टेट बोर्ड मान्यता प्राप्त निवासी व अनिवासी शाळेच्या विद्याथ्र्यांनी अभुतपुर्व यशासह बारावीच्या परिक्षेत यश मिळविले. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थी अत्यंत उत्कृष्ट गुणांसह यशस्वी झाले आहेत. या यशाने सहकार विद्या मंदिरने विद्याथ्र्यांवर घेतलेल्या कठोर परिश्रम व सर्वांगीण विकासावर मोहोर उमटवली.

वाणिज्य शाखेतुन कु.इशिता कोठारी हिने 97.33ऽ मिळवित विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविला तर दुसरा क्रमांकावर कु. प्रगति मालु 96.17ऽ व तिसरा क्र. कु.तनिशा अग्रवाल 96.00ऽ तसेच चौथा क्रमांक कु. जुनेरा पटेल 95.67ऽ आणि पाचवा क्रमांक कु. प्रेरणा शेवाळे हीनेे 95.50ऽ आणि कु. समुध्दी सुसर 95.50ऽ तर स्वराली देशपांडे हीने 94.67 ऽ मिळविले.

सोबत विज्ञान शाखेतुन चि. युवराज येवले हयाने 90.00ऽ मिळवित विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळविला तर दुसरा क्रमांकावर कु. अनुष्का खर्चे हीनेे 89.50ऽ मिळविले तर चि. कार्तीक गायकवाड याने 89.50ऽ गुण प्राप्त करुन तिस­या क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे 87.50ऽ गुण मिळवुन चौथा क्रमांक प्राप्त केला तसेच पाचव्या क्रमांकावर प्रत्युष देशपांडे 84.67ऽ याचा आला.

अभिमानास्पद बाब म्हणजे 90ऽ पेक्षा जास्त 20 विद्यार्थी तर 36 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उर्तीण झाले आहेत. यश मिळालेल्या इतर विद्याथ्र्यांची नावे खालील प्रमाणे कु. सुहाणी कसरे, देवेश नैनानी, अरमान मखनी, चंदन राठोड, सार्थक टेहरे, समृध्दी सौडतकर, श्रेयश भांगे, अनुष्का कुलकर्णी, कन्मय मोरे, मयुरेश जोशी, वृक्षभ जैन, मुक्ती चावला, प्रार्थना पाखरे हे आहेत.

बुलडाण्यासारख्या ग्रामीण भागात वसलेल्या या शाळेचे वैशिष्टे म्हणजे केवळ महाराष्ट्रातून नाही तर देशातील विविध राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. शाळेचे निर्सगरम्य वातावरण, पारंपारिक शिक्षण शैलीसह आधुनिक तंत्रज्ञानाने विद्याथ्र्यांना शिकविण्याची पद्धती, भव्य क्रिडांगण तसेच विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासावर देण्यात येणारे लक्ष हे या शाळेची वैशिष्ट¬े आहेत.
विद्याथ्र्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष श्री.राधेश्यामजी चांडक, बुलढाणा अर्बन अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर, व संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर, प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी सर्व विद्याथ्र्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
विद्याथ्र्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय अध्यक्षा सौ.कोमल झंवर, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page