शिवसाई यूनिवर्सल जुनिअर कॉलेज कोलवड , बुलडाणा ची 12वी च्या उत्क्रुश्ट निकालाची परंपरा कायम
विज्ञान शाखा निकाल - 96.87 %

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या परीक्षा मध्ये शिवसाई यूनिवर्सल ज्युनिअर कॉलेज कोलवड बुलडाणा येथील 64 विद्यार्थी प्रवेशित झाले होते.
यापैकी एकूण 45 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत,15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 02 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 02 विद्यार्थी गैरहजर राहिले होते.
याप्रमाणे महाविद्यालयाने आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.महाविद्यालयातून रुशिकेश बाठे याने 86% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तर कु. प्रांजली बाहेकर हिने 85% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर त्रुतिय क्रमांक अनुप जाधव याने 84.67% गुण प्राप्त केले आहे. कु. पलक अग्रवाल, कु. मोहिनी सोनूने यांनी प्रत्येकी हिने 84% गुण प्राप्त केले आहेत. स्रुशटी गवळी 83.83%, अभिनय जाधव 83.50%,आयन खान नासिर खान (83.17%), शेख शावेज 83.5%, कल्याणी जाधव 83%, कार्तिक इंगोले 83%,आदित्य उबर्हन्डे 82.67%,सोहम अत्तरकर 82.50%,अभिषेक पवार 82.33%,संजीवनी सावळे 82%, साक्षी जाधव 81.83%, ओम करागळे 81.67%, दर्शन लहाने 81.50%, जान्हवी किन्होलकर 81.50%, प्रणव तायडे 81.50%,आकाश देशमुख 81.33%, यश पवार 80.50%, प्रांजली वानखेडे 80.17%, आदित्य डुकरे 80.17%, प्रसाद आडेकर 80%गुण प्राप्त करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
शिवसाई यूनिवर्सल ने NEET,JEE व CET परीक्षेत देखील आतापर्यंत आपला निकालाचा दबदबा कायम ठेवला आहे. आतापर्यंत एकूण 14 विद्यार्थी MBBS ,41 विद्यार्थी BAMS व BDS साठी प्रवेशित झाले आहेत. तर JEE च्या माध्यमातून 1 विद्यार्थी IIT, 5 विद्यार्थी NIT व 5 विद्यार्थी IIIT साठी प्रवेशित झाले आहेत.
तर CET परीक्षेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी इंजिनियरिंग, अग्रिकल्चर , नर्सिंग , फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झालेले आहेत. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुनील दाभाडकर, प्रा .प्रमोद मोहरकर, प्रा. सविता वानखेडे, प्रा.रिजवान खान, स्वप्नील काकडे, प्रा. मनोहर उजेड, प्रा. विशाल निकम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक करणार्या सर्व विषय शिक्षक तथा प्राध्यापकांचे संस्था अध्यक्ष श्री. डी एस लहाने सर यांनी अभिनंदन केले.