“सर्वाधिक शस्त्रक्रिया करणाऱ्यांच्या यादीत डॉ रवी शिंदे जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहाव्या क्रमांकावरयाबद्दल केले वन्यजीव सोयरे यांनी सत्कार”

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शल्य चिकित्सक डॉ. रवी शिंदे हे जास्तीत जास्त नेत्र शस्त्रक्रिया करून गरजु रुग्णाच्या डोळ्यांना नव संजीवनी देण्याचे कार्य करत आहेत आज पर्यंत त्यांच्या हातून १५००० ते २०००० पेक्षा ही जास्त यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. गावखेड्यातील वृद्ध रुग्ण शिंदे डॉक्टर च्या हाताने शस्त्रक्रिया करायचे असे अट्टाहास देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहायला मिळते.
जगामध्ये साधारण ४ कोटी अंधव्यक्ती आहेत त्यापैकी सुमारे १.२ कोटी अंधव्यक्ती ह्या एकट्या भारतामध्ये आहेत. त्यापैकी सुमारे २० लाख अंधव्यक्ती बुबूळ प्रत्यारोपण शस्त्राक्रियेने नजर परत येऊ शकते. तसेच अनेक वृध्द रुग्ण हे मोतिबिंदु ने परेशान असतात. अलीकडच्या काळात रुग्ण सेवेला भरारी देण्यात यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रकाषझोतात आलेले डॉ. रवी शिंदे यांच्या बाबतीत आवर्जून सांगावे वाटते की आता पर्यंत त्यांनी जेवढया शस्त्रक्रिया केल्या तेवढ्या यशस्वी झाल्या आहेत. अनेक लोकांना खर तर हेच माहित नसते की सरकारी दवाखान्यात मोतिबिंदु तसेच अनेक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. खर तर मोतिबिंदु हा आजार जास्त करून वृध्दामध्ये आढळून येते. समाज सेवा करण्यासाठी इतर क्षेत्रातील लोकांना इकडे तिकडे जावे लागते परंतु आरोग्य सेवेत काम करणाऱ्या लोकांना आपले काम १०० टक्के जबाबदारी ने केले तर इतरत्र जाण्याचे काम पड़त नाही.
राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत सर्वाधिक मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणारे नेत्र शल्य शल्य चिकित्सक चा राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या वतीने मार्च २०२५ चा जाहीर करण्यात आलेल्या अहवाल नुसार जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील नेत्र शल्य शल्य चिकित्सका डॉ. रवी शिंदे यांनी जिल्ह्यातुन प्रथम तर राज्यातुन सहा वा क्रमांक मिळवला आहे. संपुर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील मोतिबिंदु शस्त्रक्रिया, नेत्रबुब्बुळे जमा बाबत, शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी व चष्मे वाटप, नेत्र शल्य चिकित्सक निहाय शस्त्र क्रिया अहवाल व डोळयांच्या इतर नेत्र शस्त्र क्रियाबाबत भौतिक व आर्थिक अहवाल या आयुक्तालया मार्फत दरमहा केंद्र शासनास सादर करण्यात येत असतो. त्या नुसार केंद्र शासनास सादर केलेल्या अहवालात डॉ. रवी शिंदे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांनी जिल्ह्यातील मोतिबिंदु शस्त्रक्रिया, नेत्रबुब्बुळे जमा बाबत, शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी व चष्मे वाटप या कार्यक्रमा अंतर्गत एकुण १४०७ यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्या आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय यांनी आज ३० एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पत्रा नुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, २४ ते माहे मार्च, २०२५ चा भौतिक व आर्थिक खर्चाचा अहवालाच्या अवलोकन नुसार रुग्ण सेवा ही ईशर सेवा हे ब्रीद वाक्य जोपासत डॉ. रवी शिंदे यांनी यशस्वी कामगिरी करत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. या कार्याची दखल घेऊन वन्यजीव सोयरे बुलडाणा यांच्याकडून डॉ रवी शिंदे यांचे सत्कार करण्यात आले आहे.
डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी वन्यजीव सोयरे प्रकाश डब्बे से नि नायब तहसीलदार, गणेश श्रीवास्तव, विशाल ढवळे आणि नितिन श्रीवास्तव उपस्थित होते. वृध्द गरजु व्यक्तीच्या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत केल्या जातात. ज्या रुग्णाला अडचणी आल्या किंवा काही माहिती या बाबत नसेल अश्या रुग्णानी वन्यजीव सोयरे बुलडाणा यांच्या सदस्यांना संपर्क साधावा तसेच वृध्द गरजु व्यक्तिने आपले मोतिबिंदु शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफत कराव्या असे आवाहना वन्यजीव सोयरे बुलडाणा यांच्याकडून वन्यजीव सोयरे नितिन श्रीवास्तव यांनी केले आहे.