व्यायामशाळा विकास अनुदान योजना; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायाम साहित्य खरेदी, खुले व्यायाम साहित्य खरेदी, व्यायामशाळा दुरुस्ती व नुतणीकरणासाठी 7 लक्ष रुपये तर व्यायामशाळा बांधकामासाठी 14 लक्ष रुपये अनुदान दिल्या जातो. इच्छुक व पात्र संस्थानी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.
अनुदानाकरीता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतीगृह इत्यादी तसेच क्रीडा विभागाचे संकुले, पोलीस विभागाअंतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्टस क्लब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्ष पुर्ण झालेली आहेत असे शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील.शासन निर्णय दि. 8 जानेवारी 2019 नुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावे, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.