Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांवराजा तालुक्यातील तीन गावासाठी टँकर मंजूर….

Spread the love

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगांवराजा तालुक्यातील चिंचोली बुरुकुल, शिवणी अरमाळ व मेंडगाव या तीन गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.

 

चिंचोली बुरुकुल येथे 463 पशुधन व 1 हजार लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 29 हजार 570 लिटर्स पाणी पुरवठा, शिवणी अरमाळ येथे 700 पशुधन व 2 हजार 700 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 68 हजार 900 लिटर्स पाणी पुरवठा, मेंडगाव येथे 1 हजार 21 पशुधन व 3 हजार 500 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 94 हजार 500 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page