निलेश चोपडे यांनी वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम;निराधारांना केले अन्नदान

मलकापुर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे:-येथील दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व आपलं मलकापूर वृतपत्राचे संपादक निलेश बाळु चोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून रेल्वे स्टेशनं रस्त्याच्या कड़ेला उघडयावर असलेल्या निराधार लोकांना खिचडी व बर्फी (अन्नदान) वाटप केले.यामुळे निलेश चोपडे यांनी वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.यामुळे निलेश चोपडे यांचे परिसरात कौतुक होत आहे.
त्यावेळी मनसे शहर प्रमुख गणेश ठाकूर,मनसेचे निखिल चिम,दिव्यांग फाउंडेशन महा.राज्य.सल्लागार पंकज मोरे, प्रहार उपजिल्हा प्रमुख अजय टप,प्रहार तालुकाध्यक्ष अजित फुंदे,शहरप्रमुख शालिकराम पाटील,विजय चोपडे,अंकित नेमाडे, संतोष गणगे,अंनत दिवणाले,महादेव भगत,इत्यादी उपस्थित होते.