धकधकता लावा स्वराज्याचा छावा गुगळीत उसळला जनसागर..छत्रपती संभाजी महाराजांना शिवविचारांची मानवंदना.
इतिहास गढूळ करणाऱ्यांचे मनसुबे शिवप्रेमींनी उधळून लावावे...:-शिव व्याख्याते सुदर्शन शिंदे.

मोताळा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-छत्रपती संभाजी राजांनी उभ्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही.मुघलांच्या छाताडावर बसून स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी संभाजी राजे सह्याद्रीचा पहाड म्हणून उभे ठाकले. छत्रपती शिवाजी राजे नंतरही स्वराज्य अभेद्य ठेवल्यामुळे संभाजी राजांना स्वकियाकडून कलंकित करण्याचा डाव मोघलांनी आखला. शक्ती युक्ती आणि आमिषानेही न झूकणाऱ्या धर्मवीर योद्धांला कलंकित करून संपविण्याचे षडयंत्र तत्कालीन मुघल धार्जिन्या इतिहासकारांनी रचले. त्यामुळेच छत्रपती संभाजी राजेंनी मुघलांच्या डावात सहभागी झालेल्या स्वराज्यातील कलंकित सचिवांना हत्तीच्या पायदळी तुडविले. असे मत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.सुदर्शन शिंदे यांनी व्यक्त केले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोताळा तालुक्यातील गुगळी येथे शिवशक्ती मित्र मंडळ, गुगळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 मे ला सायंकाळी धगधगता लावा स्वराज्याचा छावा या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवव्याख्याते शिंदेंनी उपरोक्त विचारांची शिवांजली समर्पित केली. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय,धर्मवीर संभाजी महाराज,शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली समर्पित केली. दिव्या पाटील, राधिका देशमुख,प्रेरणा वाघ या विद्यार्थिनीच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवधर्मपिठावर आदर्श गाव सरपंच अप्पा कदम, प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष गणेश शिंदे पाटील, गुगळी सरपंच रमेश वाघ,राष्ट्रीय बजरंग दल जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील, प्रांत उपाध्यक्ष भूपेश पाटील,कोऱ्हाळा बाजार उपसरपंच गजानन बोडखे पाटील, रामेश्वर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिव व्याख्यानपूर्व समयोचित अभ्यासपूर्ण मनोगत प्रमुख उपस्थित प्रबोधनकार ॲड.रोठे पाटील, सिंदखेड गावाचे आदर्श सरपंच अप्पा भाऊ कदम यांनी व्यक्त केले.
शिव व्याख्यानाचे बहारदार संचालन रामेश्वर पिसे व सचिन काकडे यांनी केले.यशस्वीतेसाठी भागवत देशमुख, शुभम पाटील, दीपक पाटील, विशाल पाटील, अक्षय पाटील, श्रीकांत पाटील, सोपान भा. पाटील, मुकुंदा पाटील, बंडूभाऊ देशमुख, रमेश गार्वे, विकास किन्होळकर, प्रतीक देशमुख, अक्षय सांगळे, आकाश पाटील, सोपान पाटील, सुमित पाटील, सचिन गार्वे यांच्यासह शिवशक्ती गणेश मित्र मंडळ, गुगळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी अथक परिश्रम घेतले.
शिव व्याख्याते शिंदे पुढे म्हणाले की,छत्रपती संभाजी राजांना रगेल आणि रंगेल म्हणणारी अवलाद महाराष्ट्राच्या भूमीतून निस्तनाभूत करणे शिवप्रेमींचे ध्येय आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या संभाजी राजेंना बाजूला सारून वयाने लहान असलेल्या राजारामांना पुढे करणारी अवलाद कोणाची होती..? हे आता जगजाहीर झाले आहे. जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती घराण्यात एकदाही लढाईमध्ये स्त्रियांना सोबत नेले नाही. नाच गाणे मैफिल भरवली नाही. त्यामुळे तत्कालीन मुघल सम्राट,अकबर यांची मनसुखगिरी करणाऱ्या सरदारांना स्वतःवरील कलंक पुसण्यासाठी छत्रपती संभाजी राजेंना रगेल आणि रंगेल रंगविण्याचा फार्स करण्यात आला. यासह छत्रपती राजांच्या जीवनातील महिलांचा आदर्श,शौर्य,पराक्रम आणि अंतिम प्रसंग आपल्या खास शैलीत शिंदेंनी जिवंतपणे रेखाटला.
_________
भारतीय सैनिकांना राष्ट्रगीतातून मानवंदना..
जय जवान जय किसान ची गर्जना..
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी, शहीद जवानांना आदरांजली देण्यासाठी राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. भारत माता की जय.. जय जवान जय किसान च्या गगनभेदी घोषणा देताना उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सैनिकांप्रती असलेला आदर ओसंडून वाहत होता.
________
विशेष आकर्षण..
मोताळा तालुक्यासह जिल्ह्यातील शिवप्रेमी,इतिहास संशोधक, सामाजिक, राजकीय, वैचारिक चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची स्वयस्पूर्तिने उपस्थिती दर्शविली. महिला पुरुषांसह युवक युवतींचा बहुसंख्येने आयोजनात सहभाग होता. टाळ्यांचा कडकडाट.जय भवानी जय शिवराय ची गगनभेदी गर्जना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.