केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा:= आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे शुक्रवार दि. 16 मे रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 11 वाजता मेहकर येथून बुलढाणाकडे प्रस्थान. दुपारी 12.30 वाजता श्री छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अवंत फाऊंडेशनच्या सौजन्याने स्कुल बॅग वटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा वार्षिक योजना समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे राखीव. सायंकाळी 6.42 वाजता डॉ.शिवानी व डॉ. निलेश यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, मलकापूर रोड, बुलढाणा. त्यानंतर सोईनुसार मेहकरकडे रवाना होतील.