छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत चळवळ व वारकरी चळवळ हीच मुख्य विचारधारा…आ सिद्धार्थ खरात
सामाजिक,आर्थिक व समताआतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी प्रस्थापित होऊ दिली नाही...आ सिद्धार्थ खरात

मेहकर:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन मेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाराज उद्यान परिसरात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते बोलत असताना म्हणाले की या महाराष्ट्राची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वारकरी चळवळ वसंत चळवळ यावरच महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण चालायला हवं तसेच संविधानाने दिलेली समता न्याय आणि बंधुत्व असताना गेल्या 75 वर्षात अद्यापही समाजात समता आलेली नाही सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय झाला नाही आज पर्यंत च्या राज्यकर्त्यांनी ही सामाजिक समता प्रस्थापित होऊ दिली नाही त्याला हे राज्यकर्तेच जबाबदार असल्याचं प्रखर मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले.