आरोग्य कृषी , पिक विमा , घरकुल , रोजगार हमी योजनाचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना त्वरेने द्या …केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित यंत्रणेना दिले निर्देश

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )आरोग्य विभागातर्गत रिक्त असलेली पदे त्वरित भरावी प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे त्वरेने पूर्ण करावी कृषी पीक विमा योजना , घरकुल योजना , रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांची जाण संबंधित विभागाच्या प्रमुखांना करून देऊन लाभार्थ्यां केंद्रबिंदू मानून योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित प्रशासनाला दिल्यात बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भावनांमध्ये आज 16 मे रोजी जिल्हा वार्षिक नियोजन समितीची आणि खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत उपरोक्त सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्यात आरोग्य विषयक आढावा सुरू असताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेतला सोबतच ही पदे त्वरित भरण्याचे निर्देश दिलेत केले केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना अंतर्गत विविध कामे जिल्ह्यात सुरू आहेत त्या कामांना गती देऊन ते त्वरेने पूर्ण करावेत अशा सूचनाही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना , राष्ट्रीय रोजगार हमी योजना , पिक विमा योजना संदर्भात मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न करून लाभार्थ्यांच्या समस्येची जाण करून दिली लाभार्थ्यांना दिरंगाईमुळे नुकसान झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासनाने कारवाई करावी अशा सूचनाही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून काही कंपन्या बी बियाणांची विक्री करतात आहे अशा कंपन्यांवर कृषी विभागाने लक्ष ठेवावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली महाबिजने संशोधन करून शेतकऱ्यांसाठी संकरित व नवीन बियाणे विकसित करावीत हवामान आणि पर्जन्याचा विचार करून पोषक असणाऱ्या हवामानावर अधिक उत्पन्न देणाऱ्या पीक लागवडीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे अशा सूचनाही खरीप आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कृषी विभागांना दिल्यात.