Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
बुलढाणा जिल्ह्याला मिळाले नवीन एसपी निलेश तांबे तर विश्व पानसरे यांची बदली…

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जिल्ह्याची आता कायदा सुव्यवस्था या सूत्राची धुरा आता नवे एसपी( जिल्हा पोलीस अधीक्षक ) निलेश तांबे यांच्या हाती देण्यात आली आहे. गृह विभागाने आदेश काढत विश्व पानसरे यांची बदली केली व त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती केली आहे.
विश्व पानसरे यांना रा.रा. पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती येथे समदेशक म्हणून पाठविण्यात आले आहे. दरम्यान नवे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे नागपूर येथे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत होते. त्यांचा तपास कौशल्य, गुन्हेगारावरची पकड आणि आक्रमक कार्यशैली ही त्यांची ओळख आहे त्यामुळे आता बुलढाण्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नवे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहे.