केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात लोणार येथे काढण्यात आली तिरंगा रॅली…

बुलडाणा( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )जम्मू कश्मीर येथील पहेलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 भारतीय नागरिक ठार झाले या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, ऑपरेशन सिंदूरद्वारे माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्याचे तळ भारतीय सैन्याने उध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यालाही भारतीय जवानांनी चोख प्रतिउत्तर दिले भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि पराक्रमाला सलाम करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने आज 23 मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते त्यानंतर या तिरंगा रॅली सुरुवात झाली लोणार शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत रॅलीचा पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भारत माता की जय …वंदे मातरमच्या घोष दिल्यात त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते माजी सैनिकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या तिरंगा रॅलीमध्ये
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी , महिला आघाडी प्रमुख मायाताई म्हस्के आशाताई झोरे शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी तालुकाप्रमुख भगवान सुलताने सुरेश तात्या वारूळकर शहर प्रमुख पांडुरंग सरकटे जयचंद भाटिया कविता दांदडे अंजना गवळी यमुनाबाई फंगाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते