विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मेहकर ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) बियाणे खरेदी विक्री व्यवसायासाठी 10 लाख रुपये माहेरवरून आणण्याचा तगादा लावून विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या 8 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुस्कान तनवीर मोहम्मद रियाजुद्दीन रा. तेलंगणा ह.मु. मेहकर जि. बुलढाणा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी पती मोहमद रियाजोददीन मोहमद समियुददीन, सासु उलफत बी मोहमद समियुददीन, दिर उलाउददीन मोहमद समियुददीन, जाउ साजीदाबी सलाउददीन,दिर अलाउददीन मोहमद समियुददीन, दिर जिया मोहमद
समियुददीन, ननंद अफसरबी मोईन, नणंद कैसर मोहम्मद साजीद सर्व रा. तेलंगना केंडुकुर नेदुनुर जि.रंगारेडडी तेलंगणा यांनी माहेरवरून 10 लाख रुपये आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला आहे. प्लॉट खरेदी विक्रीचा व्यसाय करण्यासाठी आरोपींनी होलसेल बियाणे खरेदी विक्रीच्या व्यवसायासाठी 10 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला.ही मागणी पुर्ण केली नाही म्हणून आरोपींनी 26 जानेवारी 2025 ते आज पर्यंत वेगवेगळे कारणे दाखवून वाद घातला. मारहाण केली. शिवीगाळ करुन फोनवर व प्रत्यक्ष जिवे
मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तसेच तलाक, तलाक, तलाक म्हणून आई वडील व इतर नातेवाईकांना अपमानीत करुन सासरच्या मंडळींनी शारीरीक व मानसीक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 85, 115 ( 2 ) 352, 351, बीएनएस सह कलम 4 मुस्लिम महिला विवाह वरील हक्क संरक्षण अधिनियम 2019 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.