Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
पोतदार शाळे समोर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) शहरापासून जवळच असलेल्या माळविहीर येथील एका 40 वर्षीय शेतकऱ्याने पोतदार शाळे समोर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज 25 मे रोजी समोर आली आहे.सुनील अंबादास तायडे रा. माळविहीर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सुनील अंबादास तायडे हे माळविहीर येथे राहत होते.मतदार शाळेजवळ त्यांचे अडीच एकर शेत आहे. त्यांनी आज पोतदार शाळे समोरच्या एका झाडाला दोरी बांधून गळफास लावून जीवनयात्रा संपवली.त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक भाऊ दोन बहीण असा आप्त परिवार आहे.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.