Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात जखमी झालेले जिल्ह्याचे सुपुत्र सहाय्यक कमांडर सागर बोराडे यांची घेतली भेट …!

दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची केली विचारपूस ...!

Spread the love

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांचा गड उध्वस्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेत सी आर पी एफचे सहाय्यक कमांडर बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र सागर बोराडे यांना आपला एक पाय कायमस्वरूपी गमावावा लागला आहे त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सागर बोराडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीविषयी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली

 

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील नक्षलवाद्यांचा केजीएम गड उध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन संकल्प राबविण्यात आले सी आर एफ च्या जवानांनी नक्षलवाद्यांना हे तळ उध्वस्त करत असतानाच नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरंग स्फोटात सी आर पी एफ चे सहाय्यक कमांडर व बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र सागर बोराडे हे गंभीरित्या जखमी झाले होते त्यांना आपला एक पाय कायमस्वरूपी गमवावा लागला असून त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आज 29 मे रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयाला भेट देऊन सहाय्यक कमांडर सागर बोराडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली व काही काळी त्यांच्यासोबत घालविला सागर बोराडे यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारा संदर्भातील माहिती एम्स रुग्णालयाकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती घेतली …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page