भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा बुलढाणा च्या सहकार्याने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य वाटप तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

जळगाव जामोद:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:– दि ३०/०५/२०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत समाज कल्याण विभाग, बुलढाणा व पंचायत समिती, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य वाटप तपासणी शिबिर पंचायत समिती सभागृह जळगाव जामोद येथे संपन्न झाले.
या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य वाटप तपासणी शिबिरामध्ये जवळपास ७० ते ८० लोकांची नोंदणी करण्यात आली लवकरच त्यांना त्यांच्या साहित्याचे वाटप करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यासाठी आज जळगाव (जामोद) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय श्री.संदीपजी मोरे साहेब,भाजपा दिव्यांग आघाडीचे खामगाव जिल्हा संयोजक माननीय श्री.अंबादासजी निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस माननीय श्री चंद्रकांतजी शिंदे, जळगाव जामोद शहराध्यक्ष माननीय श्री सुधीरजी इंगळे, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे मीडिया प्रभारी मा.श्री.राजू विजय बडेरे यांची उपस्थिती त्याचबरोबर मोलाचे सहकार्य लाभले