ब्रिटिशांशी शेवटपर्यत लढा होळकरानीं दिला:आ सिद्धार्थ खरात
जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

देऊळगाव राजा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-छत्रपती शिवाजी महाराजानी मराठी राज्याची पायाभरणी केली. त्या नंतर अनेक लोकांनी हे महाराजांचं राज्य उपभोगलं. मात्र ते टिकविण्यासाठी प्राण पणाला लावले. त्याचं नाव म्हणजे महाराज यशवंत होळकर आहे याच होळकरांनी शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढण्याचं काम केलं असल्याचं प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकला गाटोळे, आमदार मनोज कायंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, फुले शाहू आजाद विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद शेळके, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कायंदे, युवा नेते योगेश जाधव,गंगाधर भाऊ जाधव,दीपक बोरकर गणेश बुरुकुल, गजानन पवार, अनिल चित्ते, तोताराम नागरे सुनील मतकर,तुळशीराम पंडित डॉ उमेश मुंडे, मानसिंग राजे जाधव , प्रभाकर सोरमारे राजू गाटोळे, दिनकर गाटोळे, विजय गाटोळे, यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की इंग्रजी सेनेने होळकरी सेनेचा असा धसका घेतला की यशवंतरावाचे नुसते नाव ऐकले तरी इंग्रज अधिका-यांचा थरकाप उडे. इंग्रजांचा बंदोबस्त करुन दिल्लीच्या बादशाहला इंग्रजांपासून मुक्त करण्याची योजना तयार केली. यशवंतरावाच्या नेतृत्वाखाली होळकरी सेना पराक्रमाची पराकाष्ठा करते. इंग्रजी सेनेच्या पोलादी भींती होळकरी तोफानी उध्वस्त केल्या शिस्तबद्ध लढा देणा-या सैनिकांची अक्शरश: दानादान उडली. पण याच दरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडते. यशवंतरावांच्या मित्राने यशवंतरावाशी गद्दारी केली ऐनवेळी दगाबाजी करुन मोठी सेना सोबत घेऊन इंग्रजांच्या बाजूला उभा राहीला याचा फटका बसणे स्वाभाविक होते. दिल्लीची लढाई मोठ्या शौर्याने लढविणारी होळकरी सेना नजरेच्या टप्प्यातील विजय एका दगाबाजामूळे गमावून बसते. दिल्लीतिल चांदणी चौकात दगाबाज खत्रीची हवेली होय.
नेपोलियन म्हणून यशवंतराव होळकर यांची ख्याती पोहचली.अशा प्रकारे इंग्रजी सेनेला धूळ चारणारा हा महान राजा सर्व हेवेदावे विसरुन शिंदे व भोसल्याना देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजां विरुद्ध पेटुन उठण्यास आवाहन करतो. भारताला इंग्रजांच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन हाडवैरी शिंद्यांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांविरुद्ध लढण्यास मैदानात उतरतो. पण शिंदे ते शिंदेच. पराकोटीची राजतृष्णा, होळकरांच्या मालमत्तेवर लोभी नजर व आतून अत्यंत द्वेषमूलक अन राजलालसेनी झपाटलेले शिंदे ईथेही धोखाधडी करतात. त्यामूळे यशवंतराव परत एकदा हताश होऊन एकला चलोच्या मार्गाने जातात. दक्षिण भारता पासून थेट पंजाब, लाहोर पर्यंत स्वत: दौड मारुन प्रत्येक राजाची भेट घेणारा व इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारा यशवंतराव होळकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जनक आहे. स्वातंत्र्य लढयाचे प्रणेते:उभ्या आयुष्यात एकही लढा न हारणारे महाराज यशवंतराव या बाबतीत नेपोलियनलाही मागे टाकतात.भारत काबीज करण्याचा इंग्रजांचा मनसूबा कधीच पुर्ण झाला नाही. त्यांच्या नंतरही त्यांची वीर कन्या भीमाबाईने इंग्रजांशी मोठ्या शौर्यानी लढा दिला असल्याच यावेळी सिद्धार्थ खरात यांनी सांगितले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी न्यायदेवता म्हणून ओळखल्या जातात आमदार मनोज कायंदे
अहिल्यादेवी न्यायप्रिय व्यक्ती होत्या. त्यांच्या राज्यात नियमानुसार चालणाऱ्या न्यायालयांची सुरुवात झाली. त्यांनी अनेक न्यायालयांची निर्मीती केली व न्यायधिशांची नियुक्ती केली. त्यामुळे, लोकांना सहज न्याय मिळू लागला. सर्व गावात पंचायत मंडळे स्थापन करुन न्यायाच्या कामाला गती देण्यात आली. पंचायत व न्यायालय यांच्या सर्व न्याय-निवाड्याचे विवरणपत्र राज्यातील उच्च अधिकारी व अहिल्यादेवी यांच्याकडे जात असे. पंचायत व न्यायालयात ज्यांचे समाधान होत नसे असे लोक अहिल्यादेवी यांच्याकडे न्याय मागत असे. अहिल्यादेवी यांची योग्य न्याय देण्याची किर्ती सगळीकडे पसरली होती. अशाप्रकारे त्यांच्या राज्यात चोख न्यायव्यवस्था अस्तित्वात होती. भारताच्या नागरिकांना योग्य, सहज व जलद न्याय देण्याचं काम देखील त्यांनी केला असल्याचे यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले
जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुशोभीकरणासाठी जे जे शक्य होईल तेथे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले
विकासासाठी कायम कटिबद्ध डॉक्टर शशिकांत खेडेकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगभरात अनेक ठिकाणी घाट मंदिरे बांधली व अनेक मंदिराचा जिर्णोद्धार केला आज त्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जगभरात साजरी होत आहे त्यांच्या कार्याचा अफाट महासागर आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही त्यामुळे जवळखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी जो विकास निधी लागेल तो राज्य शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सांगितले.यावेळी डॉक्टर सुनील कायंदे डॉक्टर रामप्रसाद शेळके गंगाधर जाधव दीपक बोरकर योगेश जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मतकर यांनी तर प्रास्ताविक विजय गाटोळे तर आभार प्रदर्शन अक्षय गाटोळे यांनी केले.