Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

भारतीय रेल्वेचा उपक्रम; ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

Spread the love

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : रेल्वे पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. युवक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

ही यात्रा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (भारत गौरव टुरिस्ट ट्रेन) अंतर्गत 9 जून रोजी मुंबई येथून सुरू होत आहे. या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

 

सहल तपशील : सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दि. 9 जून 2025 कालावधी: 5 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं: दादर, ठाणे यात्रेचा प्रवासमार्ग- मुंबई (सीएसएमटी) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

 

पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: भारत गौरव ट्रेनने प्रवास (एसएल/३एसी/२एसी/एसी/नॉन-एसी) हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी), सुरक्षा व्यवस्था.

दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे. दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती). तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे. चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर. पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई. सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाच्या (आयआरसीटीसी) वेबसाईट: www.irctctourism.com अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे उपयुक्त ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page