बुलढाणा जिल्हा सुतार समाज जिल्हाध्यक्ष पदी श्री अनंत राऊत यांची लोकशाही पद्धतीने निवड…
13 जुलै रोजी होणार गुणवंत विद्यार्थी सोहळा 2025

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दि 1 जून 2025 रोजी सकाळी 12 वाजता श्री खटकेश्वर महाराज मंदिर चिखली येथे गुणवंत विद्यार्थी सोहळा 2025 तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची निवड ह्या विषयासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ विजयजी खोलाडे लाभले होते ह्या कार्यक्रमाची सुरुवात सृष्टीचे निर्माते, कलेचं आराध्या दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, खटकेश्वर महाराजांचे पूजन करून सदर जिल्हास्तरीय बैठकीला सुरुवात झाली.
गुणवंत विद्यार्थी सोहळा 2025 हा भव्य कार्यक्रम 13 जुलै 2025 ला घेण्यात यावा असं एकमताने निर्णय घेण्यात आला.या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्हा सुतार समाज जिल्हाध्यक्ष पदी अनंत राऊत सरांची बिनविरोध निवड करण्यात आली.गेल्या विस दशकापासून आपली शिक्षकी नोकरी सांभाळत समाजासाठी अविरत सेवा देणारे,सध्याचे निवृत्त शिक्षक,विश्वकर्मा सेवा समिती चिखली चे उपाध्यक्ष,अभ्यासू व्यक्तिमत्व, तथा समाज चळवळीमध्ये कायम एकनिष्ठ असलेले, जिल्ह्याची अस्मिता बाळगणारे,श्री अनंत राऊत सर यांची लोकशाही पद्धतीने बिनविरोध बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
ह्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून सरांना बुलडाणा जिल्हा कोअर कमिटीच्या च्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार देण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा कोअर कमिटीचे जेष्ठ मार्गदर्शक श्री समाधान सुरुशे सर, सुतार विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते सतिश शिंदे, श्री शांतारामजी सोनुने सर, जेष्ठ कार्यकर्ते श्री सदानंदजी जंजाळ, रायपूर मातला मावळते जिल्हाध्यक्ष डॉ विजयजी खोलाडे,बुलढाणा, श्री गजानन जावरकर, तथा विश्वकर्मा सेवा समितीचे सर्वच पदाधिकारी, उपस्थित होते.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन विनोद खोलगडे यांनी केले.आणि आभार प्रदर्शन चिखली तालुक्याचे प्रसिद्धी प्रमुख विशाल जावरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी गजानन जावरकर साहेबांनी सगळ्यासोबत विश्वप्रार्थना गाऊन सभेची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी चिखली तालुक्यातील मेहकर बुलढाणा तालुक्यातील मंडळी बहुसंख्य मंडळी हजर होते.