Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुजा ताई सावळे सरचिटणीस सरला ताई बाहेकर आणि उबाटा महिला आघाडी प्रमुख जिजाबाई राठोड यांनी शिवसेनेत केला प्रवेश …

Spread the love

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस ( मा.आजित पवार ) गटाच्या जिल्हाध्यक्ष सौ.अनुजाताई सावळे पाटील आणि उबाठा गटाच्या महिला आघाडी प्रमुख सौ.जिजाताई राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस (मा.आजित पवार )गट महिला सरचिटणीस सौ.सरलाताई बाहेकर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश जिल्हयात शिवसेनेला संघटनात्मक मजबुती देणारे ठरणार आहेत.

मुंबई येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयामध्ये 3 जून रोजी हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा आमदार संजय गायकवाड शिवसेना प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ( मा.आजित पवार ) गटाच्या जिल्हाध्यक्ष सौ.अनुजाताई सावळे पाटील आणि उबाठा गटाच्या महिला आघाडी प्रमुख सौ.जिजाताई राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस (मा.आजित पवार )गट महिला सरचिटणीस सौ.सरलाताई बाहेकर यांच्यासह बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील श्री.जयकुमार सरकटे,श्री.अरुण अंभोरे,सौ.दीपाली वाचोळ,सौ.दीपाली पवार,सौ.विश्रांती जाधव श्री.विजय राठोड, सौ.संगीता पवार, सौ.दिपाली वायचोळ आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केला.मुंबईतील शिवसेना पक्ष कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डीवरे, संजय हाडे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेला जिल्ह्यात संघटनात्मक उभारी देणारा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page