Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

दहशतवाद कारवाई नंतर शिष्टाई करण्यासाठी विदेशात गेलेले शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ.श्रीकांत एकनाथराव शिंदे यांचा केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला सत्कार. 

Spread the love

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):पाकीस्तान दहशतवादयांना आश्रय देतात… या दहशतवाद्यांचा त्रास भारतासोबतच युएई, युको, अमेरीका या देशांनाही बसत आहे. संपुर्ण जगातुन दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाचा बिमोड करणे गरजेचे आहे. अस हे पटवुन देण्यात शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळ यशस्वी झाल. अस मत व्यक्त करत केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांचा गौरव करत सत्कार केला.

पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यु झाला. त्यानंतर भारताच्यावतीने ऑपरेशन सिंदुर राबविण्या आले. यामध्ये पाकीस्तानातील दहशतवाद्यांचे स्थळ नष्ट करण्यात आले. भारताने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन खासदारांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले होते. यातीलच पहिल शिष्टमंडळ शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्व पक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पश्चिम अफ्रिकेतील युएई, लायबेरीया, काँगो, सिएरा, लिओन या देशांच्या दौऱ्यावर गेले होते. हा दौरा आटपुन आल्यानंतर केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यात नुकतीच औपचारीक चर्चा झाली या चर्चेत त्यांनी सांगीतले की, दोन राष्ट्रांनी भारताने केलेल्या कारवाईचा खुले समर्थने केले. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी भारतासोबत असल्याचे त्यांनी सांगीतले. भारताने उचलले पाऊल हे दहशतवाद संपविण्यासाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले. दहशतवाद्यांना पोसण्याचे काम पाकीस्तान करत आहे. या दहशतवाद्यांचा प्रत्येक देशाला त्रास होत आहे. दहशतवाद्य संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येक देशांनी दहशतवाद विरोधात पुढाकार घेणे गरजेचे आहे. हे विषय पटवुन देण्यात शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळ यशस्वी झाले. असे गौरद्गार केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त करुन त्यांचा सत्कारही केला. दिल्ली येथे केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास औपचारीक चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते संजय निरुपम उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दहशतवादा विरुध्द भारताचा जगासमोर मांडण्यासाठी शिवसेना पक्षाला देण्यात आलेली संधी शिवसेनेसाठी अभिमास्पद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page