Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

पर्यावरण मित्र बुलडाणाचे पर्यावरण वाढीचे कार्य पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणारे-अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:– पर्यावरण वाढविणे आणि प्रदूषण रोखून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असुन ती प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडली पाहिजे . झाडे लावून व स्वच्छता राखून पर्यावरणास हातभार लावला पाहिजे . पर्यावरण मित्र मंडळाने बुलडाणा शहरात व परिसरात जी पर्यावरण चळवळ सुरू केली आहे ती बुलडाण्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असल्याने सर्वांनी झाडे लावणे, बीजारोपण, जाहिराती साठी झाडाला खिळे ठोकून होणारी इजा रोखणे असे विविध उपक्रम पर्यावरण मित्र बुलडाणा यांनी सुरू केलेले आहे. हे सर्व उपक्रम पर्यावरण वाढ आणि ऱ्हास कमी करणारे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बुलडाणा येथे सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविताना केले.

 

*थंड हवेचे ठिकाण हे बुलडाणा शहराचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न*

पर्यावरण मित्र चंद्रकात काटकर

 

बुलडाणा शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रदूषण आणि वृक्ष तोड यामुळे बुलडाणा शहराची ही ओळख पुसल्या जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण मित्रांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा यासाठी झाडे लावा झाडे जागवणारी ” जन्म दिनी वृक्ष लावा अंगणी” ही मोहीम 2016 पासून सुरू केली. या मोहिमेत सर्व नागरिक सहभागी झाल्यास बुलडाणा शहराची थंड हवेचे ठिकाण ही ओळख पुन्हा प्राप्त होईल यासाठी बुलडाणा शहर वासियांनी या पर्यावरण पुरक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण मित्र चंद्रकात काटकर यांनी या वेळी केले.

सायकल रॅलीत लहान मोठ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

पर्यावरण मित्रांच्या या सायकल रॅलीची आणि चळवळीची आज दशक पूर्ती होती. 2016 मध्ये बुलडाण्याच्या पर्यावरण मित्रांनी एकत्र येऊन जन्म दिनी वृक्ष लावू अंगणी ही मोहीम सुरु केली होती. तसेच प्रत्येक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण विषयक जनजागृती केल्या जाते. आज या उपक्रमास 10 वर्षे पूर्ण झाली

दि ५ जून २०२५ रोजी पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली साठी आणि वृक्षारोपणासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांची मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. या रॅलीत बुलडाणा शहरातील पर्यावरण मित्रांच्या सायकल रॅलीस शेकडोच्या संख्येने पर्यावरण प्रेमींनी सायकल चालवत सहभागी झाले होते . वनविभाग बुलढाण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे साहेब यांनी नागरिकांना ‘आंब्याची कोय भविष्याची सोय’ या उपक्रमांतर्गत आंब्याच्या कोयी व फळझाडांच्या बिया वन विभाग बुलढाणा येथे जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संकल्प सर्वांनी करूया असा संकल्प करण्यात आला.

पर्यावरण जागृती साठी या सायकल रॅलीत सायकल सह विविध शासकीय अधिकारी ,कर्मचारी बहुसंख्य स्त्री पुरुष नागरिक, विध्यार्थी, विध्यर्थिनी मोठया संख्येने सहभागी झाले होते . 4 वर्षे वयापासून ते 70 वर्षे वयाच्या बाल व वृद्ध व्यक्तीनी ह्या रॅलीत सहभाग नोंदवला आहे .सार्थक डांगे याने अस्वलाची वेशभूषा करून वन्यजीव वाचविण्यासाठी केलेले आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  दरवर्षी प्रमाणे रश्मी पंजाबी आणि नेवरे यांचा वाढदिवस असल्याने राणी बगीच्या येथे त्यांच्या हस्ते झाडे लावून त्यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.पर्यावरण मित्र मंडळ बुलडाणाच्या वतीने दरवर्षी बुलडाणा शहरातून पर्यावरण जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत असते .त्याप्रमाणे ह्यावर्षी सुध्दा आयोजित सायकल रॅलीचा आरंभ हा गांधी भवन जयस्तंभ चौक येथून होऊन बाजार लाईन मधून भगवान महावीर चौकातून कारंजा चौक तेथून स्व.भोंडे सरकार चौकातून एडेड चौक, पुढे मोठया देवीपासून त्रिशरण चौक, पुढे सोसायटी पेट्रोल पंपासमोरून सुंदरखेड SBI शाखेजवळून परत येऊन राणी बगीच्या येथे  वृक्षरोपण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सदर कार्यक्रमास पर्यावरण मित्र चंद्रकांत काटकर, मुकुंद जोशी, अनु माकोने, मुकुंद वैष्णव, प्रदीप डांगे, निलेश शिंदे, दीपक पाटील, जीवन जाधव, निर्मल पंजाबी, मोंटी पंजाबी, शैलेश खेडेकर, जयंत दलाल, अनुप सोनोने, चितळे दादा त्याचबरोबर गायत्री सावजी, संगीता पंजाबी, रश्मी पंजाबी, सार्थक डांगे, प्रीती डांगे यावेळी उपस्थित होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा तसेच वन विभाग बुलढाणा चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सामजिक वनीकरनाचे उप वनसंरक्षक अधिकारी विपुल राठोड़ व वन विभाग बुलढाणाचे उप वनसंरक्षक अधिकारी श्रीमती सरोज गवस मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी अभिजीत ठाकरे साहेब वनसंरक्षक अधिकारी, मोहसीन खान, विठ्ठल बकाल, अंबादास गीते, रघुनाथ नेवरे, सुनील गायकी, राहुल आढाव, विक्रम राऊत, गजानन डोईफोडे, लक्ष्मी जाधव, संदीप मडावी, अमोल चव्हाण, नितेश गवई, समाधान झोटे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी डॉ. निकम, पर्यावरण प्रेमी स्वप्निल धनवटे, गणेश जैन, महावीर जैन, अनिता कापरे, विधी राठी, निधी राठी, डॉ. राठी मॅडम, दिशा पंजाबी, जाधव सर, राम सोनवणे इत्यादी पर्यावरण मित्र उपस्थित होते.सदर रॅलीच्या शिस्तबद्धतेसाठी बुलडाणा पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच रॅलीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय यांनी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page